MAHADAJI  SHINDE VIDYALAYA  SHRIGONDA

 
 
 
 
 
 
 
माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यात प्रथम प्रतिमेचे पूजन केले.त्यानंतर जिल्हा प्रशिक्षण संस्था संगमनेर येथील प्रा.जाधव सर व प्रा. शेवाळे सर यांनी तसेच विद्यार्थी उज्ज्वल डोळे याने मनोगत व्यक्त केले...दिवसभर विद्यार्थ्यांनी खुल्या वाचनाचा आस्वाद घेतला.... या सर्व कार्यक्रमांचे नियोजन विद्यालयाचे ग्रंथपाल मा.देशमुख सर यांनी केले
महादजी शिंदे विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जयंती व रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या महोत्सवानिमीत्*👉महादजी शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज* *रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवा* निमित्त 👉 *पत्रकार बांधवांचा सन्मान* 👉 *माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून बहुपयोगी सभागृहाचे भूमिपूजन* महादजी शिंदे विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या वतीने नियोजित सभागृहाचे भूमिपूजन समस्त पत्रकार, व माजी विद्यार्थी यांच्या हस्ते महादजी शिंदे विद्यालयात संपन्न झाले यावेळी विद्यालयाच्या अगदी सुरुवातीच्या बॅच मधील विद्यार्थी मा.भाऊसाहेब कापसे, शेख मॅडम,शंकरलाल काला,दिलावर पठाण,निशिकांत दंडनाईक,लतीफभाई जमादार एम.टी.दरेकर,प्रकाशशेठ पटवा यावेळी उपस्थीत होते याचवेळी माणिकचंद संजयकुमार बोरा यांनी 11,000(अकरा हजार रू) तर थोर देणगीदार काला भाऊसाहेब यांनी सभागृहाच्या बांधकामासाठी पत्नीच्या स्मरणार्थ 1,00,000 (एक लाख रू.) देणगी जाहिर केली घरातून विरोध असुनही केवळ रयत मुळे मी शिकू शकले असे प्रतिपादन विद्यालयाची पहिली मुस्लिम विद्यार्थीनी शेख मॅडम यांनी केले. स्वतःच्या संस्था न उभारता रयत मध्ये काम करणारे बाबासाहेब भोस व बबनराव पाचपुते यांचे योगदान मोलाचे आहे असे मत पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे यांनी व्यक्त केले बाळासाहेब बळे,भाऊसाहेब कापसे,काला भाऊसाहेब, बाबासाहेब भोस यांनी मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब भोस यांची समन्वय समिती पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी रयतचे नाव सातासमुद्रापार न्यावे असा आशावाद कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक प्राचार्य कन्हेरकर सर, सुत्रसंचालन भुजबळ सर, तर आभार पर्यवेक्षक नलगे सर यांनी मानले यावेळी समस्त पत्रकार बांधव, माजी विद्यार्थी, कार्यकर्ते यांचा विद्यालय व रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला....त
महादजी शिंदे विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जयंती व रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या महोत्सवानिमीत्त रांगोळी स्पर्धा व चित्र प्रदर्शन उद्घाटन करताना डॉ होले,सुनिता शिंदे,राजु गोरे व इतर निमंत्रित व सर्व सेवक वृंद
महादजी शिंदे विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जयंती व रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या महोत्सवास आरंभ
महादजी शिंदे विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जयंती व रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या महोत्सवास आरंभ भव्य मिरवणूकीचे https://youtu.be/jwcIiJvjc7Y
  *महादजी शिंदे विद्यालयात उमाजी राजे नाईक यांचे जयंती साजरी*      रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालयात उमाजी राजे नाईक जयंती साजरी करण्यात आली. उमाजी राजे नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उमाजी राजे यांचा आदर्श समोर ठेऊन समाज, देश, व सर्वसामान्य जनतेसाठी त्याग करण्याची तयारी प्रत्येकाने केली पाहिजे असा आशावाद प्राचार्य टी.पी.कन्हेरकर सर यांनी व्यक्त केला. या प्रसंगी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक सोनवणे सर, जानराव सर, बोडखे सर, उपप्राचार्य दळवी सर यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन झगड़े सर यांनी केले तर आभार खेडकर सर यांनी मानले.
  *महादजी शिंदे विद्यालयात उमाजी राजे नाईक यांचे जयंती साजरी*      रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालयात उमाजी राजे नाईक जयंती साजरी करण्यात आली. उमाजी राजे नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उमाजी राजे यांचा आदर्श समोर ठेऊन समाज, देश, व सर्वसामान्य जनतेसाठी त्याग करण्याची तयारी प्रत्येकाने केली पाहिजे असा आशावाद प्राचार्य टी.पी.कन्हेरकर सर यांनी व्यक्त केला. या प्रसंगी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक सोनवणे सर, जानराव सर, बोडखे सर, उपप्राचार्य दळवी सर यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन झगड़े सर यांनी केले तर आभार खेडकर सर यांनी मानले.
महादजी शिंदे विद्यालयात रंगला विद्यार्थ्यांचा शिक्षक दिन. शिक्षक दिनी शिक्षकांना केले वृक्ष वाटप , विद्यालयाला दिला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या प्रसंगी विद्यार्थी प्राचार्य विजय वाघ व विद्यार्थी शिक्षक
विज्ञान व गणित विषय सभेमध्ये विविध विषयावरील चर्चा करताना विद्यालयातील शिक्षकवृंद व प्राचार्य दिनांक 21 ऑगस्ट 2018.
शिक्षण परिषदेमध्ये विविध विषयावरील चर्चेत आपले मार्गदर्शन करताना विद्यालयातील शिक्षक मा.पाडळे सर ...... दिनांक 18 ऑगस्ट 2018.
महादजी शिंदे विद्यालय माता पालक संघाची स्थापना व विविध विषयावरील चर्चेत आपले मत व्यक्त करताना विद्यालयातील शिक्षिका ...... दिनांक 16 ऑगस्ट 2018.
महादजी शिंदे विद्यालय माता पालक संघाची स्थापना व विविध विषयावरील चर्चेत आपले मत प्रभावीपणे व्यक्त करताना माता पालक.......
विद्यालयाच्या विद्यार्थी व सेवकवर्ग यांच्यावतीने दिव्यांग व्यक्तीस रु.4255 मदत करताना प्राचार्य कण्हेरकर सर व इतर सेवक दिनांक 16ऑगस्ट 2018
72 वा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करताना मान्यवर,आजी माजी विद्यार्थी ,पालक RSP पथक , व रयत संकुल........
स्कॉलरशीप परीक्षेत विद्यालयाची गगनभरारी विक्रमी 23विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक गुणवत्ता यादीत पात्र
Hollyball संघातील विद्यार्थीनी
महादजी शिंदे विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाची बैठक सिंचन भवन पुणे येथे संपन्न यावेळी उपस्थित मा.शेखर गायकवाड साहेब,दांगडे साहेब, धुमाळ साहेब,सप्रे साहेब
Science olimpiyad मध्ये यशस्वी विद्यार्थी
विविध क्रीडा स्पर्धा मध्ये यशवंत विद्यार्थी
तज्ञ बाह्य व्यक्ती मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ लवांडे सर विषय:-करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास
आण्णा भाऊ साठे जयंती व लो.टिळक स्मृतीदिनानिमित्त माजी विद्यार्थी संघाकडून गणवेश वाटप कार्यक्रम
आण्णा भाऊ साठे जयंती व लो.टिळक स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम
शाळा पालक शिक्षक संघाची स्थापना व बैठक व विविध विषयांवर चर्चा
गुरुकुल पालक मेळावा व पालक प्रबोधन शिबिर
वाचन संस्कृती रुजावी म्हणून ......खुले ग्रंथ प्रदर्शन
This is a free homepage created with page4. Get your own on www.page4.com
 
MAHADAJI SHINDE VIDYALAYA 0